पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणेरी टाइम्स टीम…

काल दिनांक 13 रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या दालनात दौंड मधील भ्रष्टाचाराचा कुंभ फुटला. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्ट विकासाचा दांडू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत मोडीत काढला आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना याचा चांगलाच चाप बसणार आहे. दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील विकास कामांचे टेंडर कदम यांनी घेतली होते. याचे 40 लाखांचे बिल काढण्यासाठी तीन अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती‌. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला अगोदरच कळवले होते, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने सापळा लावून भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे… या कारवाई मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (दक्षिण) ‘बाबुराव कृष्णा पवार’ दौंड, शिरूर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता ‘दत्तात्रय भगवानराव पठारे’ तसेच दौंड पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता ‘अंजली प्रमोद बगाडे’ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासक काळात अधिकाऱ्यांची चांगलीच चांदी होत आहे, सध्याचा महिना हा मार्च महिना असल्याने अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांची बिले तातडीने काढण्याच्या बहाण्याने चांगलीच ‘लयलुट’ होत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आपल्या प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येत आहे, या कारवाईने वरीष्ठ अधिकारी यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे…

Leave a Comment

[adsforwp id="47"]