पुणेरी टाइम्स टीम…
आज सालाबादप्रमाणे जनहित फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त ऊस तोड मजुरांच्या मुलांना आध्यात्मिक गुरू तात्या महाराज ढमाले यांच्या शुभहस्ते व उद्योजक विश्वास अवचट, जेष्ठ वकील उदय फडतरे, माजी सरपंच रमेश भोसले, कृषीअधिकारी कैलास चव्हाण, कामगार नेते धोंडीबा शितोळे ह्या मान्यवरांचे उपस्थितीत नवीन कपडे व परिवारास मिठाई वाटप करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी बाबुराव साळुंके,नितीन शितोळे, गणेश मोरे,सुरज शितोळे,ऋषी खंडाळे, भाऊ सोनवणे, आदेश शितोळे, विशाल शितोळे, सचिन फडतरे, संदीप शितोळे आदी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.
सदरचा कार्यक्रम एकूण तीन ठिकाणी घेणेत आला एकूण ७४ मुलांना कपडे व परिवारास मिठाई वाटप करण्यात आली असेच समाजोपयोगी उपक्रम जनहित फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असतात अशी माहिती जनहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदर्श सरपंच वनश्री मनोज फडतरे यांनी दिली …!!