पुणेरी टाइम्स टीम…(Nitin Chandgude – Supe)
शहाजी चांदगुडे (वय 40) दंडवाडी (खोपवाडी) सुपे बारामती पुणे असे या विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात घडली आहे. खांबावर असणारे ताणतारेचा थेट जमिनीशी किंवा अपघात होवू नये यासाठी वापरण्यात येणारा विद्यूत रोधक (चिनीमातीचा कप) त्या ठिकाणी नसल्याने वीज प्रवाह ताणतारेमार्फत जमिनीपर्यत उतरला आणि शेतकरी शहाजी चांदगुडे जिवानिशी गेला असा आरोप येथील स्थानिक शेतकरी करीत आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या खांबाच्या ताणतारेला चालू विजेच्या प्रवाहाची तार चिकटल्यामुळे ही घटना घडल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
घटनास्थळी सुपे पोलीस तातडीने दाखल झाले होते मात्र वीज वितरण कंपनीचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी तातडीने हजर झाले नाहीत त्यामुळे त्यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे…