ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

धनगर आरक्षण आंदोलनास संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र चा जाहीर पाठिंबा…

पुणेरी टाइम्स टीम

धनगर आरक्षणाचा लढा साठ वर्षापासून सुरू आहे. ‘धनगड की धनगर’ या शब्दछलामुळे धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गा (ST) मधून आरक्षण मिळत नाही. म्हणून यासाठी धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर समाज हा शिक्षित व आरक्षित असलाच पाहिजे तरच प्रतिनिधित्व मिळेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनाची धग प्रचंड आहे. प्रत्येक समाज बांधव पोटतीडकीने लढत असून सरकार मात्र निगरगठ्ठपणे हा सर्व संघर्ष लांबून पाहत आहे. या विरोधात अजून ताकतीने आपणा सर्वांना मिळून संघर्ष करावा लागेल. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे ते धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं मिळालच पाहिजे.

यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जन्म गावी चौंडी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आपणास पाठिंबा देत आहोत व पुढील संपूर्ण लढ्यात आम्ही सर्व ताकतिनिशी सहभागी होऊ.असे आश्वासन संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आले आहे. यापुढेही आपण जो योग्य तो निर्णय घ्याल संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत.असे निवेदनात म्हटले आहे.‌सदर निवेदनावर महादेव मातोरे व संतोष शिंदे प्रवक्ते संभाजी ब्रिगेड यांच्या सह्या आहेत…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]