टीम – पुणेरी टाइम्स
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, लोणारवाडी, वाटलूज, खानोटा, वडगाव दरेकर या गावात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक ठिकाणी बिबट्या नागरिकांना दिसत आहे.
त्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. वडगाव दरेकर तालुका दौंड येथील शेतकरी मनीषा तुकाराम बाराते यांची शेळी वरती बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केली आहे. सदर ठिकाणी वन विभागाचे अधिकारी निखिल गुंड यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे व नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल आवाहन केले आहे…

1 thought on “बिबट्याचा शेळीवर ताव,बिबट्याच्या धास्तीने शेतकरी भयभीत दौंड मध्ये या गावात बिबट्याचा वावर…”
बेधडक बातम्या