ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याआधी दौंड तालुक्यातील या भागात उद्योजकांच्या घिरट्या वाढल्या…

पुणेरी टाइम्स – पुणे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये असणारा संत जगद्गुरु पालखी महामार्ग नुकताच पूर्णत्वास जात आहे, हा महामार्ग पुर्ण होण्यास काही महिन्यांचा अवधी आहे मात्र दौंड तालुक्यातून वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, पाटस या गावातून हा मार्ग महामार्ग जात असून या महामार्गाचे काम या भागात ९० टक्के पेक्षा जास्त झाल्याने येथील वाहतुकीला चांगलीच गती मिळाली आहे.
मात्र त्याचबरोबर एवढा मोठा भव्य दिव्य महामार्ग या भागातून गेल्याने येथील जमिनीला सोन्याचे दिवस आले आहेत. हा महामार्ग पूर्ण होणे बाकी असतानाही उद्योजकांनी या भागात घिरट्या घालायला सुरुवात केली असून लाखो रुपये एकर दराने मिळणारी जमीन आता कोटीच्या वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे या भागात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे. तर शेतकऱ्यांनाही शेती विकायची नाही राखायची असते हे म्हणायची वेळ आली आहे…

गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील हा महामार्ग पूर्ण होवू लागल्यानंतर या भागात नवनवीन उद्योग व्यवसाय येण्यासाठी सज्ज झाले असून अनेक जण व्यावसायिक जमिनी या भागात शोधत आहेत. त्यामुळे या भागातील केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
तसेच या भागातून जाणारी बहुचर्चित बुलेट ट्रेन, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात उभारण्यात येणारे आदानीचे खाजगी विमानतळ यामुळे या भागाला भलतेच महत्त्व यायला लागले आहे.
याचाच धागा धरत गुंतवणूकदारांनी आपला गुंतवणुकीचा मोर्चा या भागातील जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी वळविला आहे, त्यामुळे इथल्या जमिनीला बोलतेस महत्त्व वाढले असून जमिनीचा बाजार भाव कोट्यावधीवर जाऊन पोहोचला आहे…

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]