ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

दौंड च्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मात्र हाताची घडी तोंडावर बोट?

मलठण प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील मलठण, खानोटा, काळेवाडी, बोरिबेल, राजेगाव, लोणारवाडी या गावात व पंचक्रोशीत बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या बिबट्याच्या हल्ल्यात अनेक वासरे, शेळ्या, कुत्रे फस्त झाली आहेत. या बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याने चक्क गावातही वर्दळीच्या ठिकाणी जनावरांच्या गोठ्यात जाऊन अनेक शेळ्या, वासरे, कुत्रे फस्त करण्याचा धडाका लावला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ, शेतकरी धास्तावून गेले आहेत. तर वाड्या वस्त्यावरून येणारे शालेय मुले अक्षरशः भयभीत झाले आहेत. गेली दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणार्‍या या बिबट्याचा वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
या भागात शेतमजूर, कामगार शेतात कामांसाठी येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वनविभागाला अनेक वेळा माहिती देऊनही तुम्हीच फटाके वाजवा, सावध राहा आगीचा भडका करा अशा तोंडी सूचना देऊन वेळ मारून नेण्याची नामुष्की दौंड वन प्रशासनावर आली आहे.
पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग आज, उद्या, परवा पिंजरा लावू असे म्हणतात व पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे वनविभागाच्या भुमिकेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्लात नाहक बळी गेल्यावर वेळ येईल व प्रशासन पिंजरा लावणार की काय असा सवालही येथील नागरिकांना पडत आहे.

आठ दिवसांत या धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा सतर्कतेचा इशारा येथील सर्व ग्रामस्थांनी व शेतकरी बोलून दाखवत आहेत…

Leave a Comment

[adsforwp id="47"]