पुणेरी टाइम्स टीम
अंतरावली सराटी, ता. अंबड, जिल्हा – जालना येथे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला गाव मोजे पाटस, तालुका – दौंड, जिल्हा – पुणे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, सदर पाठिंब्याचे पत्र उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कैलास शितोळे, शिवशंभू राजे प्रतिष्ठानचे सचिव दत्तात्रय वाबळे, पत्रकार सचिन आव्हाड, चंदू आबा काळे यांनी दिले आहे. यापुर्वीही संपूर्ण पाटस गाव बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे व शासनाचा निषेध केला आहे. आपण मागणी केलेल्या सर्व मागण्या शासनाने तातडीने सकारात्मक विचार करून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आगामी काळात आपण जो निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही कायम राहू असे पाठिंब्याचे पत्रात म्हटले आहे…
1 thought on “मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाटस ग्रामपंचायतीचा जाहीर पाठिंबा”
पाटस ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र शिंदे सरकार आणि पाटस ग्रामपंचायत टीमने मनोज तरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन.