पुणेरी टाईम्स टीम…-पुणे
भारतीय जनता पार्टीने पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषता पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात आपली पाळेमुळे अधिक जोमाने रोवण्यासाठी सुरूवात केली आहे, भाजपा ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठीची जबाबदारी दौंडचे “आमदार राहुल कुल” यांच्यावर असल्याचे राज्यभर बोलले जात आहे, राहुल कुल यांच्या माध्यमातून नुकतेच राज्यातील ‘बडे राजकारणी, यांनी भाजपात एन्ट्री केली आहे. आमदार कुल यांच्या या राजकीय डावाने पश्चिम महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.
त्यातच दौंडचे सुपुत्र असलेले देवकर यांनी गलांडवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच, हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, गलांडवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचीटणीस, विधानसभा संयोजक म्हणून कामकाज पाहिले आहे. याच कामाच्या जोरावर उमेश देवकर यांना भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेच्या सदस्य पदाची ‘लॉटरी’ लागली आहे. या निवडीची माहिती त्यांना नुकतीच मिळाली आहे, यावेळी देवकर बोलताना म्हणाले की, मला ही संधी आमदार राहुल दादा कुल यांच्या मुळे मिळाली असल्याचे देवकर यांनी सांगितले. मी या संधीचे सोने करीन असेही यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना भावना व्यक्त केल्या. तळागाळातील छोट्या मोठ्या संस्था, आस्थापना आणि संघटना याबाबत देवकर यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे. राहुल कुल यांचे अतिशय विश्वासू असलेले उमेश देवकर यांना सामाजिक कामाचा अनुभव दांडगा आहे, प्रामाणिक कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे, हेच ओळखून आमदार राहुल कुल यांनी देवकर यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेच्या सदस्य पदी शिफारस केल्याचे समजते. आज राहुल दादा कुल मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या समवेत पत्रकार विशाल धुमाळ, जयदीप सोडनवर, अशोक दिवेकर, राहुल हंडाळ सर उपस्थित होते…