पुणेरी टाइम्स टीम… दौंड
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच दौंड मध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्यभरात शरद पवार यांची तोफ अनेक ठिकाणी जोरदार धडकत आहे. शरद पवार आपले राजकीय डाव टाकून अनेक दिग्गजांचे राजकीय गड ढासळण्यासाठी राज्यातील सत्ता बदलण्यासाठी काम करीत आहेत.
दौंड च्या राजकीय गणितांचा तिढा सोडवत दौंड विधानसभेची निवडणूक दुरंगी करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशआप्पा किसनराव थोरात यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रमुख ‘शरदचंद्र पवार’ यांच्या उपस्थितीत वरवंड येथील बाजार मैदानावर आज सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेसाठी होळकर घराण्याचे भूषण सिंह होळकर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आजच्या या सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार, दौंंडची राजकीय उलथापालथ करण्यासाठी आपला कोणता राजकीय डाव वापरणार तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर काय बोलणार हे पाहणे महत्वााचे करणार आहे. या सभेला तालुक्यातील गावागावातून मोठ्या संख्येने मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश थोरात यांनी केले आहे. या सभेत शरद पवार काय बोलणार आणि दौंड साठी आपला कोणता राजकीय डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.