BY पुणेरी टाइम्स टीम (पुणे)
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत गोटात ‘तुतारी’ इंदापूर तालुक्यात पुढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुरुवारी अचानकपणे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण शुक्रवारी इंदापूर मध्ये जाहीर सभा घेणार असल्याचा निरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिला असून त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात महत्त्वाच्या लढती पैकी एक असणारी बारामती लोकसभेची निवडणूक महायुतीने प्रतिष्ठेची केली आहे, यात बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मतांच्या आघाडी घेऊ शकतात असा खात्री लायक माहिती भाजपला प्राप्त झाली आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी इंदापूर मध्ये जाहीर सभेत नेमके काय बोलतात याकडे इंदापूर तालुकावासियांचे यांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकी मित्र पक्षांचा शब्द पाळला खरा परंतु त्यांना विधानसभा निवडणुकीत कायमच दगा फटका झाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते यावेळी वेगळा निर्णय घेऊ शकतात, तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांचे सर्वच समर्थक यावेळी प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराचे काम करतील याबाबत शंका उपस्थित होऊ लागले आहे…
त्यामुळे सुप्रिया सुळे यांना सध्या तरी सकारात्मक वातावरण इंदापूर विधानसभा मतदारसंघात असून याकडे महायुतीने गंभीरपणे लक्ष द्यावे. अशा सूचना महायुतीच्या कोअर कमिटी मधून करण्यात आल्याने शुक्रवारी थेट देवेंद्र फडणवीस इंदापुरात जाहीर सभा घेत आहेत. अशी खात्रीशीर सुत्रांकडून माहिती मिळत आहे.
या सभेत फडणवीस माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेचा शब्द देणार का? तसेच विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे राजकीय भवितव्य काय असणार याविषयी फडणवीस जाहीरपणे बोलणार की फक्त लोकसभेची निवडणूक मारून नेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…