पुणेरी टाइम्स टीम – (बारामती)
बारामती येथील कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, आजवर कामांची पावती द्यायची असेल तर लोकसभेला उमेदवार निवडून द्या. मतदारांनी भावनिक न होता विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. तर त्याचवेळी बारामती मध्येच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे या विविध विवाह सोहळ्यांना उपस्थित लावत होत्या.
भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून बारामती मध्ये कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे महायुतीमध्ये ज्यावेळेस जागा वाटपाचा निर्णय होईल, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी ही जागा आपल्याकडे घेत येथे कमळ फुलवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून अंकिता पाटील असणार का कोणी दुसरे कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंकिता पाटील ठाकरे यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाची पदभार स्वीकारण्या पूर्वीपासूनच ते बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये प्रवास करत आहेत. नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होत, लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत अंकिता पाटील ठाकरे या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नात सून देखील आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्ये, बाळासाहेब ठाकरे व हर्षवर्धन पाटील यांना मानणाऱ्या वर्गासह विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची साथ मिळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंकिता पाटील ठाकरे याच लोकसभेच्या उमेदवार असतील अशी चर्चा सध्या सर्व लोकसभेमध्ये सुरू आहे.
अंकिता पाटील ठाकरे यांना लोकसभेसाठी दत्तात्रय भरणे मदत करणार ? बारामती येथील एका विवाहप्रसंगी अजित पवार यांचे निकटवर्तीय व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे अचानक समोरासमोर आले या वेळेस दोघांनी एकमेकांना नमस्कार करत पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. अजित पवार यांनी बारामती लोकसभेमध्ये परिवर्तन करत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून भाजपातर्फे जर अंकिता पाटील ठाकरे उमेदवार असतील तर अजित पवारांचे निकटवर्तीय, आमदार दत्तात्रय भरणे यांना अंकिता पाटील ठाकरे यांचा प्रचार करावंच लागेल अशी देखील सर्वत्र चर्चा आहे.