पुणेरी टाईम्स – दौंड
स्वातंत्र्यसैनिक व दौंडचे माजी आमदार कै. जगन्नाथ पाटसकर यांनी दौंडच्या विकासासाठी १९९० मध्ये एस. टी. डेपो व प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी स्वतःची जमीन शासनास दिली व शासनाने त्याबदल्यात कै. पाटसकर यांना जागा व राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन दिले, परंतु आजतागायत त्यांच्या कुटुंबीयांना ह्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. (आजही हे कुटुंब भाड्याच्या घरामध्ये राहत आहे) त्यामुळे शासनाच्या या पोकळ आश्वासनाच्या – भरीव पूर्ततेसाठी व पाटसकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी, दौंड तालुका मराठा महासंघाच्या वतीने – *बुधवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी, सकाळी १० वाजता, दौंड येथे पोकळ बांबू मोर्चा काढण्यात येणार आहे,* तरी जास्तीत जास्त दौंडकरांनी या मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी केले आहे.
सदर मोर्चा हा कै.ज ता पाटसकर यांच्या घरापासून – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – हुतात्मा चौक – अहिल्यादेवी होळकर सहकार चौक – नवीन तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन समाप्ती होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर मोर्चा परवानगी मिळणे बाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे.