पुणेरी टाइम्स टीम (पुणे…)
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाच्या राज्य अध्यक्षपदी पुन्हा एकदा ‘बाळासाहेब शिंदे पाटील’ यांची फेरनिवड करण्यात आली आहे. बाळासाहेब शिंदे यांचे काम हे पोलीस पाटलांच्या अडीअडचणी व पोलीस पाटलांच्या प्रशासकीय कामातील अडचणी बाबत अत्यंत चांगल्या प्रकारचे असल्याचे बोलले जाते. यापूर्वी बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी मोर्चे, आंदोलने, अधिवेशने करीत पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा लढा उभा केला होता आणि त्यास यश मिळाले आहे. बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या फेरनिवडीने पोलीस पाटलांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे. बाळासाहेब शिंदे पाटलांचा सरकार दरबारी चांगला दबदबा असल्याने पोलीस पाटलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा माणसांची नियुक्ती झाल्याचे मत पोलीस पाटलांनी संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत…