पुणेरी टाइम्स टीम…
बहुचर्चित भव्यदिव्य असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नुकताच पूर्णत्वास जात आहे. मात्र या महामार्गावरील महागड्या उपकरणांच्या चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची गरज आहे.
दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे हद्दीतून जाणाऱ्या पालखी महामार्गावरील उड्डाण पुलावरील महागडे पथदिवे, सेवा रस्त्यावरील संरक्षित कठडे (लोखंडी बॅरीकेट), दिशादर्शक फलकांच्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सामान्य जनतेच्या सोयीसाठी व वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त असणारा महामार्ग बनवला असून यावरती अनेक दर्जेदार उपकरणे बसवली व वापरली आहेत, मात्र परिसरातील भुरट्या चोरांनी ही उपकरणे चोरी करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे महामार्गाचे व परिसराचे वैभव नक्कीच कमी होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे या चोरांना पोलीसी खाक्याचा जरब बसण्याची गरज आहे…