पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातून जवळपास 80 किलोमीटरचा लोहमार्ग जात असून दौंड काॅर्ड लाईन, दौंड स्टेशन यासारखी महत्त्वाची स्टेशनही आहेत. आणि अन्य छोटी स्टेशनही दौंड तालुक्यात आहेत. दौंड तालुक्याची रचना ही भौगोलिक दृष्ट्या पूर्व पश्चिम असल्याने व रेल्वे मार्ग हा ही पूर्व पश्चिम असल्याने दौंड तालुक्याची या रेल्वेमार्गामुळे दोन भागात विभागणी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग अडथळा ठरत आहेत. रेल्वे स्टेशन, रेल्वे क्रॉसिंग,याबाबतच्या प्रश्नासंदर्भात व एक्स्प्रेस गाड्यांना दौंड स्थानकात थांबा यासारखे महत्त्वाचे अनेक प्रश्न रेल्वे कडे प्रलंबित आहेत. याबाबत आमदार राहुल कुल यांना केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी येथील स्थानिक प्रश्नाबाबत दौंड स्थानकाला भेट देऊन बैठक लावण्याचे बाबत आश्वस्थ केले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक ७/१/२०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील दौंड रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्थानिक प्रश्नांबाबत बैठक घेणार आहेत. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे…
