पुणेरी टाइम्स टीम…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावरती आज दुपारी दीड वाजता दरम्यान पुण्यातील कात्रज मधील सुतारदरा परिसरात तीन ते चार जणांनी गोळीबार केला होता. त्यानंतर शरद मोहोळ याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे… गुंड शरद मोहोळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
