पुणेरी टाइम्स टीम…
गेली अनेक वर्षांपासून गाव कामगार पोलीस पाटलांच्या रखडलेल्या मागण्यासाठी पोलीस पाटील संघटनांकडून आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दौंड तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वतीने शनिवार दि.25/11/2023 रोजी पोलीस पाटील बाधंवाचे विविध मागण्यांसाठी मुंबई आझाद मौदान येथील 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर मध्ये होणार्या भव्य मोर्चा व उपोषणबाबत आमदार राहुल कुल यांची भेट घेत आमदार कुल यांना याबाबत माहिती दिली.
सरकार मधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा अशी चर्चा वजा मागणी यावेळी आमदार कुल व पोलीस पाटील संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी दौंड तालुक्यातील पोलिस पाटीलांच्या वतीने *दौंड आमदार राहुल कुल* यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राज्य खजिनदार निळकंठ थोरात पाटील, जिल्हा सचिव हनुमंत हंडाळ पाटील, मा जिल्हा सचिव विठ्ठल बारवकर पाटील, दौंड ता. सचिव विलास येचकर पाटील उपस्थित होते.
