पुणेरी टाइम्स टीम…
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये अशियन बँकेच्या सहकार्याने राज्य शासन खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणी काळभोर पर्यंत सुमारे २८ किमी बंदनळी कालवा, खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या आदींच्या दुरुस्ती, बांधकाम, विस्तार सुधारणा आदींसाठी सुमारे ३५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे घोषित केले होते.
त्यानुसार या प्रकल्पाच्या संबंधित ठिकाणांच्या स्थळपाहणीसाठी अशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळ पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून प्रकल्पासंबंधीत विविध ठिकाणांना भेट देत आहेत. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीम. श्वेता कुऱ्हाडे व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशियन विकास बँकेच्या शिष्टमंडळासह *आमदार राहुल दादा कुल* यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी खडकवासला सिंचन प्रकल्पासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. यावेळी या प्रकल्पाद्वारे सदर सिंचन प्रकल्पांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लागणार त्याद्वारे सुमारे ३-४ टिमसी पाण्याची बचत होणार असून त्याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे नमूद केले या प्रकल्पासाठी अशियन विकास बँकेच्या सहकार्याबद्दल शिष्टमंडळाचे आभार मानले.
अशियन बँकेच्या शिष्टमंडळामध्ये श्रीम.मेरी लहोस्टिस, श्री.ब्रँडो एंजेलिस, श्री.ख्रिस डनलॉप, श्री.एम के मोहंती,श्री. विकास गोयल, श्रीम.रायलदा सुसुलन, श्रीम.रँडल जोन्स, श्री.बर्नहार्ड स्टॅचरल, श्री.अलन क्लार्क यांचा सहभाग होता यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीम. श्वेता कुऱ्हाडे, यांच्यासह श्री. योगेश सावंत, उपअभियंता श्री. सुहास साळुंके, श्री. सचिन पवार, श्री. शंकर बनकर आदी उपस्थित होते.