पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)
दौंड शहरांमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. ५० रक्तदात्यांनी रक्तदानाच्या या महान कार्यामध्ये आपले योगदान दिले. गेली २४ वर्ष अखंडपणे दौंड येथील सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सलग २४ वर्ष पुण्यावरून जेम्स स्वामी हे आपल्या मित्राने चालवलेल्या या कार्यात सहभागी होण्यासाठी दौंड मध्ये येतात. यंदाचे हे २४ व वर्ष असल्याने जेम्स स्वामी हे पुण्यातील खराडी येथून पहाटे साडेचार वाजता सायकल वरून निघाले व रक्तदान शिबिरासाठी सकाळी साडेदहा वाजता रक्तदान शिबिराच्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी आपले रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी श्रमिक वर्ग स्वतःहून उपस्थित होऊन रक्तदान करतो यामध्ये रिक्षा चालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दौंड शहरातील रोटरी ब्लड बँकेने रक्त संकलन केले. गेली २४ वर्ष जॉन फिलीप हे त्यांच्या मित्र मंडळींच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करत असतात.
या शिबिराच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,वीरधवल जगदाळे,बादशाह शेख,डॉक्टर फिलोमन पवार, फिलिप एंथोनी,यांच्यासह दौंड शहरातील विविध मान्यवरांनी भेट दिली.तसेच जॉन फिलिप,मनोज नाईक, फ्रान्सिस डॅनियल,जेरी जोसेफ,सचिन रोडे रमेश खुडे,चंद्रशेखर कलपनूर रणजित बहिरट ,यांनी व सद्भावना रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य दिले.
