पुणेरी टाइम्स टीम-
राज्यातील जवळपास पाच हजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले होते. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्याने हे वेध संपल्याचे जाहीर झाले आहे. राज्यात अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या असून, जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती यांच्या रखडलेल्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यात जवळपास अडीच हजार ग्रामपंचायतीचा थेट सरपंच पदाच्या निवडणूकीसह ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचसोबत सरपंच व सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार असून पाच हजार गावांमध्ये ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे…
