पुणेरी टाइम्स टीम
दौंड तालुक्यातील एकेकाळी अर्थकारणाचा कणा असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याची आज कारखाना स्थळावरती ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार मा. राहुलदादा कुल यांचे अध्यक्षतेखाली दुपारी १:०० वाजता कारखाना स्थळावरती आयोजित केलेली आहे, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. मधुकर शितोळे यांचा फोटो न छापल्यामुळे माजी आमदार व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात गटासह हजारो शेतकरी सभासद कारखाना स्थळावरती उपस्थित राहून मधुकर शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून निषेध व्यक्त करणार आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी शितोळे यांनी आपली स्वतःची पन्नास एकर जमीन दिली असून कारखाना उभारण्यासाठी व येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. मात्र त्यांचा फोटो अहवालात छापला नाही दुर्दैवी गोष्ट असल्याचे रमेश थोरात यांनी सांगितले…
