पुणेरी टाइम्स टीम-
(परशुराम निखळे)
धनगर व ओबीसी समाजाच्या आरक्षणा संदर्भात व मराठा समाजाला ओबीसींमधुन आरक्षण देऊ नये, धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षण वाचवण्यासाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील रावणगाव येथे मेंढ्या बकरीसह ओबीसी समाजाकडून तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबाबतचे निवेदन दौंड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होते, आज सकाळी दहा वाजता हे आंदोलन करण्यात आले असून रावणगाव परिसरातील अनेक गावातील नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होत रस्त्यावर उतरले होते. पारंपारिक पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्यांची शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे रस्त्यावर उतरण्या बरोबर पारंपरिक वाद्या सह हे आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनासाठी धनगर व ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखविली यावेळी धनगर ओबीसी आरक्षण महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वय समितीचे पांडुरंग मेरगळ,
महेश भागवत, मुख्य समन्वयक दौंड तालुका धनगर ओबीसी आरक्षण समिती, बाळासाहेब तोंडे, दादासाहेब केसकर, बाबासाहेब चौरे, अमरजी बोराटे ओबीसी नेते अमोल धापटे ज्येष्ठ निवेदक वैभव आटोळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा लक्ष्मण रांधवण, माजी संचालक भीमा पाटस संपत आटोळे, माजी संचालक भीमा पाटस अप्पासाहेब भोपाळ, निलेश पोमने, संजय गाढवे, संग्राम भोपाळ, भगवान आटोळे, विलास आटोळे, विजय आटोळे, विजय गिरमे, अनिकेत भागवत, दिनकर आटोळे, निलेश बनकर, कोकरे साहेब, मौर्य क्रांती सेना युवा उद्योजक सचिन हागारे, शिवाजी मेरगळ, कल्याण गावडे, मारुती केसकर, पंढरीनाथ खोमणे, नरसिंग भागवत, नवनाथ गायकवाड, पांडुरंग मेरगळ हे उपस्थित होते.