पुणेरी टाइम्स टीम
राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव एकवटले असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे.
राज्यातील विविध भागात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. याच मागणीसाठी दौंड तालुक्यातील मलठण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासुन सुरुवात होवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजातील मेंढपाळ बांधव आपल्या बकऱ्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर बहूसंख्येने धनगर समाज दौंड-भिगवण रस्त्यावर उतरलेला यावेळी पहायला मिळाला. यावेळी धनगर समाजाने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र भावना व्यक्त करताना दिसून आले.
धनगर समाज बांधवांचा आरक्षणासाठी राज्य सरकारविरुद्ध एल्गार पाहायला मिळत आहे. आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मलठण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर बांधवांकडून आंदोलन करण्यात आले आहे.