पुणेरी टाइम्स टीम
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे येथील खाण उद्योग विकास कामांसाठी वरदान ठरत आहेत मात्र स्थानिकांसाठी शाप ठरलेले आहेत. येथील खाण उद्योगासाठी वापरण्यात येणारे बोअर ब्लास्ट भुकंपापेक्षा काही कमी नाहीत. मोठमोठ्या प्रमाणात फोडण्यात येणारे भु-सुरुंग यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. हे खाण उद्योग व बोअर ब्लास्ट येथील जीविताच्या दृष्टीने अत्यंत घातक बनलेले आहेत. भु – सुरुगांचे स्फोट स्थानिकांना धडकी भरवणारे आहेत. मात्र या सर्व गोष्टीवर प्रशासनाची मेहरबानी असल्याचे दिसून येत आहे, मात्र कारवाई शून्य आहे. त्यामुळे येथील बोअर ब्लास्ट शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत. येथील बोअर ब्लास्ट बंद करण्याची मागणी नागरिकांनी लेखी अर्जाद्वारे अनेक वेळा केली आहे. मात्र प्रशासनाने त्यास नेहमी दुजोरा दिला आहे. जमिनीचा मोठ्या प्रमाणात र्हास होत असून, पर्यावरणीय नुकसान होत आहे. कोट्यवधी पर्यावरणीय मुल्यांचे नुकसान होत असताना येथील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले क्रशर, खाण उद्योग, बोअर ब्लास्ट सुरु कसे? असा सवाल स्थानिक व पर्यावरणप्रेमींना पडत आहे. येथील प्रशासनाला भारतीय वनसंरक्षक कायदा व पर्यावरण संरक्षणाचा विसर पडलेला आहे. पर्यावरणीय मुल्यांचे झालेले नुकसान हे येथील व्यवसायिकडून वसूल करण्यात यावे तसेच येथील पर्यावरणास हाणीकारक असलेले हे उद्योग कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे.
महसूल प्रशासनाचा सावळा गोंधळ खाण माफियांसाठी चांगलाच मानवत आहे, शासनाच्या दृष्टीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र येथे यांस रितसर बगल दिली जात आहे. त्यामुळे महसूल विभाग याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष द्यावे लागणार आहे…
