पुणेरी टाइम्स टीम –
जनसेवा प्रतिष्ठाण दौंड यांच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठाणच्या संयोजन समितीने माध्यमांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गौरव घडविणारा गणराया अवॉर्ड २०२३ आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गणेशोस्तव मंडळाने आपली माहिती, केलेली सजावट, सामजिक कार्य, हे लिंक मध्ये भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील प्रत्येक गणेश मंडळांचे परीक्षण करण्याकरिता जनसेवा प्रतिष्ठाणची परीक्षा टीम प्रत्येक मंडळांपर्यंत पोहचणार असून दौंड तालुक्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या जनसेवा प्रतिष्ठाण आयोजित गणराया आवार्ड २०२३ यंदाही मोठ्या दिमाखात होणार आहे. सर्वच मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेश मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी https://forms.gle/G13CzAcWhvZmJ1Gk8 या लिंकचा उपयोग करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.