ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

खाण माफीयांचे नियमबाह्य उत्खनन थांबणार कधी? ग्रामपंचायतची नाहरकत नसताना परवाना मिळतो कसा हाच संशोधनाचा विषय❓

By.पुणेरी टाइम्स

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

(निलेश जांबले)

महसूल खात्याला खिशात ठेवून वावरणारे खाण माफीयांनी दौंड तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, पांढरेवाडी भागातील सर्व सामान्य जनतेवर नेहमीच वचक ठेवला आहे. त्यासाठी साम, दाम, दंड भेदाचाच अवलंब केला आहे. कारवाईला कोण सरसावल्यास त्याच्यावर राजकीय दबाव आणून त्यांना थांबवले आहे.

तिथे रोज खुलेआम मोठमोठे भु-सुरूंग फोडले जाताहेत… त्याचा आवाज प्रचंड मोठ्याने होतोय… मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी महसूल खात्याला वेळच नाही… अशी स्थिती खाणींबाबत झालेली दिसते. ज्या खाणींना अवघ्या महिन्यांचा व वर्षांचा उत्खननाचा परवाना होता. त्यांची खनिकर्म विभागाची व ग्रामपंचायत कार्यालयाची नाहरकत मुदत संपूनही त्या खाणी सुरू कशा आहेत, याकडे महसूल खात्याने गांभीर्यांने कधीही  पाहिले नाही, कधी चौकशीही केली नाही. किंबहुना चौकशी न व्हावी यासाठी शासकीय सेवेतीलच काही लोक नेहमीच पुढे पुढे करत असल्याचे बोलले जात आहे. त्यां शासकीय अधिकाऱ्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेण्याची गरज आहे. खाण मालकांनी त्यांचे नियमबाह्य साम्राज्य पसवल्याचे दिसून सुध्दा महसूल प्रशासन आंधळ्याची भूमिका घेत आहे. खाण माफीयांच्या अर्थपूर्ण संबंधाने कारवाई न करण्याचाच शिरस्ता येथे निर्माण झाला आहे. त्यामुळे खाणमाफीयां आणि भु-सुरुंग स्फोटामागे दडलंय तरी काय, हाच खरा संशोधनाचा विषय आहे. कारवाईला कोण सरसावल्यास त्याच्यावर दबाव आणून त्यांना थांबवले आहे. महसूल विभागाला याची सगळी माहिती असतानाही सरकारी यंत्रणा अनेकदा अर्थपूर्ण व्यवहरातून तर कधी दबावाने खाण माफियांच्या दादागिरीची बळी ठरत आहे. येथील खाण क्रशरच्या लगत बागायती शेती, वन्यजीव यांचे वास्तव्य आहे, माफीयांनी खाणी चालू ठेवण्यासाठी साम, दाम, दंड भेदाचाच वापर केल्याचे दिसते. कारवाईसाठी आलेल्यावंर खाण माफीयांनी दबाव आणायचा. जी जी यंत्रणा कारवाई करणार नाही त्यांना अर्थपूर्ण व्यवहारात अडकावयेच, उत्खननाची मुदत संपूनही खोटे दस्तऐवज तयार करून खाणी सुरू असल्याचे वास्तव आहे, मुदत संपूनही असं किती दिवस उत्खनन चालू राहणार ? असा सवाल येथील नागरिकांना पडत आहे.., नियमबाह्य व बेकायदेशीर व्यावसायिकांना असे परवाने दिले जातातच कसे असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडत आहे. मोठं मोठे भु-सुरूंग लावले जातात, त्यामुळे त्याचा होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी कित्येक वेळा पोलिस ठाण्यात आल्या आहेत, त्या त्या वेळी पोलिसांनी महसूल खात्याला कळवलेही आहे. मात्र त्यावर कारवाई काहीच झालेली नाही. सुरूंग लावण्याचा परवाना आहे का, असेल तर तो सुरूंग कधी लावण्याची परवानगी मिळाली आहे. तो परवाना किती दिवसांचा आहे, ते कसा याची कधी सखोल चौकशीच केली गेली नाही. सुरूंग स्फोट व खाणींत होणारे उत्खनन येथील पर्यावरणाला, वन्यजीवीताला, व भौगोलिक स्थितीला धोकादायक आहे. येथील भौगोलिक स्थिती नैसर्गिक आहे तशी वाचावी यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. तेवढ्यापूरते तेथे बंदी आणण्याची चर्चा होते व पुन्हा खाणी सुरू होतात. हे कायमस्वरूपी बंद होण्याची गरज आहे. खाण माफीयांकडून अर्थपूर्ण व दबावाला बळी न पडता येथील ऐतिहासिक व पौराणिक वारसा लक्षात घेवून या भागातील खाणींवर बंदी येण्याची गरज आहे. खुलासेवार चौकशी करून खाणींचे उत्खनन कायमस्वरूपी बंद व्हावे, यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]