पुणेरी टाइम्स टीम – (मुंबई)
संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही, पशुखाद्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतातील उभी पिके पाण्याविना जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीच्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत. मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रश्नी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे, व सरकारवर निशाणा साधला आहे.
पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. असा सरकारवर निशाणा साधत मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या.