पुणे टाइम्स टीम
नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खाण उद्योग व खडी क्रशर मधून शासनाचा कोट्यावधी रुपये महसूल बुडाला जात असल्याबाबतचे वृत्त नुकतेच ‘पुणे टाइम्स’ कडून प्रसिद्ध करण्यात आले होते. वासुंदे तालुका दौंड येथील हद्दीतील खाणमाफीयांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालय वासुंदे यांनी तहसील कार्यालय दौंड येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे येथील प्रशासनावर स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
येथील नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या उद्योग व्यवसायाबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता येथील तक्रारीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच खनिकर्म विभाग पुणे यांना तपासणी करण्याच्या तातडीने सूचना देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत खाण माफीयांची चौकशी होवून चुना लावणाऱ्या माफीयांना महसुली दणका बसणार आहे..