ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…

पुणेरी टाइम्स टीम…

दौंड विधानसभेची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना गेली महिनाभर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.

महायुतीचे उमेदवार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी गेल्या महिनाभरात प्रचार यंत्रणेची धामधूम असताना देखील त्यांची मुख्य ओळख असणारे आरोग्य सेवेचे काम सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्याभरात त्यांनी वीस हुन अधिक रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रचार सभेत असताना देखील त्यांना आरोग्य सेवेचा निरोप आल्यानंतर आपल्या स्वीय सहाय्यक च्या मार्फत त्यांनी संबंधित रुग्णाचे काम मार्गी लावले असून एक प्रकारे मदतीचा हात या रुग्णांना दिला आहे. आमदार राहुल कुल यांनी गेल्या दहा वर्षात रुग्णसेवेचे हजारो कामे केलेली आहेत मागील विधानसभा निवडणुकीत देखील कुलांच्या विजयात ही रुग्ण सेवेचा आशीर्वादच  कामाला आल्याचे बोलले जाते. सध्या निवडणूक काळात त्यांनी केलेल्या या रुग्ण सेवेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची असून नागरिकांच्या मदतीला उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगत रुग्णसेवा ही माझी जबाबदारी नसून कर्तव्यच आहे असे यावेळी आमदार राहुल कुल यांनी सांगितले. एकंदरीतच निवडणुकीच्या प्रचार काळात राहुल कुल करत असलेले आरोग्य सेवेचे काम त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असेही ज्या रुग्णांना मदत झाली त्यांचे कुटुंबीय जाहीरपणे बोलून दाखवत आहेत.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]