पुणेरी टाइम्स टीम (दौंड)
भारत निवडणूक आयोगाकडून दौंड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती दौंड मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.
श्रीमती. एम गौतमी यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-204 असा आहे. त्यांना दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत नागरिकांना भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक 9021508317 असा असून ई-मेल पत्ता genobs.daund.indapur@gmail.com असा आहे. संपर्क अधिकारी श्री. नागनाथ कंजेरी हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9595994455 असा आहे.