ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

‘वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनचा’ माऊली आबांना जाहीर पाठिंबा, प्रचाराचा प्रमुख वाटा उचलण्याचे दिले आश्वासन…

पुणेरी टाइम्स टीम-(पुणे): सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. अनेक नेते रिंगणात उतरून विविध मतदारसंघांमध्ये आपली दावेदारी सांगत आहेत. अशातच महाराष्ट्रातील एक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे शिरूर- हवेली मतदारसंघ. येथे अनेकांनी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. मात्र नागरिकांच्या तोंडी सध्या ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांचे नाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच माऊली आबांनी देखील कंबर कसली असून त्यांनी जनसंवाद दौरा आयोजित करून नागरिकांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे.

दरम्यान वाघोलीच्या जडणघडणात आणि वाघोलीचे प्रमुख प्रश्न मांडण्यात ज्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे, अशा वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन (वासा) यांची जनसंवाद दौऱ्यादरम्यान माऊली आबांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर सविस्तरपणे संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी सदरील असोसिएशनच्या मेंबर असलेल्या वाघोलीतील सर्वच सोसायटीचे चेअरमन यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी वाघोलीच्या प्रश्नांवर भविष्यात आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर भाष्य करून त्यांच्या ध्येय धोरणांबाबत सविस्तरपणे माहिती दिली असल्याचे समोर येत आहे. यामुळे वाघोली असोसिएशनच्या आणि वाघोलीतल्या सर्व सोसायटीतील चेअरमन लोकांनी माऊली आबांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघात निर्णायक लढत होण्याचे संकेत आहेत.असे राजकीय जाणकारांचे मत आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन (वासा) यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत माऊली आबांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी आमचा मोलाचा वाटा असेल असे आश्वासन देखील माऊली आबांना दिले आहे. त्यामुळे एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून माऊली आबांचा मतदारसंघात वाढलेला वावर आणि त्यातून निर्माण झालेला जनसंपर्क पाहता त्यांच्या विरोधातील उमेदवारांना ही निवडणूक अतिशय जड जाणार असे चिन्हं सध्या तरी स्पष्ट दिसत आहेत.

Leave a Comment

[adsforwp id="47"]