पुणेरी टाइम्स टीम (मुंबई) – दौंड तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक पार पडली, या बैठकीमध्ये दौंड तालुक्यातील प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली असून सदर मागण्यांबाबत मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आमदार राहुल कुल यांनी मागणी केलेली कामे तातडीने मार्गी लागणार असल्याचे माहिती आमदार कुल यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील या महत्त्वाच्या कामांच्या बाबतीत शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय झाल्याने याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. तालुक्यातील ही प्रमुख कामे मार्गी लागण्याच्या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार कुल यांच्यासाठी हे अधिवेशन व बैठका बेरजेच्या ठरणार आहेत… लोकसभा निवडणुकीनंतर दौंड मधील राजकीय वातावरण हे विधानसभेसाठी तापू लागले आहे. त्यातच आमदार कुल यांनी आपल्या विकासाची घोडदौड अधिक ताकतीने पुढे नेत दौंड साठी महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘आमदार कुल’ यांना याचा मोठा फायदा होणार आहे…
- आमदार राहुल कुल यांनी मागणी केल्याने प्रमाणे दौंड शहरातील तालुका नाट्यगृहासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव महसूल विभागात प्रलंबित असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात यावा अशी मागणी केली, तसेच अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी केली, याबाबत १५ दिवसाच्या आत जागा मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले आहेत.
- दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न असलेले दौंड स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व अधिकारी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली होती याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
- भिमा नदीवरील उजनी धरणाच्या बॅकवॉटर मधील उजनी धरण संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली होती. याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रांत व तहसीलदार यांचे समवेत बैठक घेऊन, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दौंड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भांडगाव ता. दौंड येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असुन, त्यामध्ये अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत. या बाधित योग्य मोबदला देण्यात यावा व चुकीच्या पद्धतीने झालेल्या भूसंपादनातून मार्ग काढावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली होती, याबाबत जिल्हाधिकारी, पुणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूसंपदान अधिकारी यांनी त्यांच्या स्थरावर बैठक घेऊन तातडीने मार्ग काढावा असे निर्देश महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. यावेळी आमदार श्री. जयकुमार गोरे, महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. राजेश कुमार साहेब, सहसचिव श्री. संतोष गावडे, श्री. श्रीराम यादव श्री. सुनील कोठेकर, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी श्री. अजय मोरे, अवर सचिव श्री. संजय जाधव प्रांताधिकारी दौंड श्री. मिनाज मुल्ला, तहसीलदार दौंड श्री. अरुण शेलार, उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री. धनराज शिंदे, भूसंपादन अधिकारी श्रीम वनश्री लाभषेटवार, मुख्याधिकारी दौंड नगरपालिका श्रीम. विद्या पोळ, उजनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
1 thought on “आमदार ‘राहुल कुल’ यांचा विधानसभा निवडणूकीआधीच “दौंडकरांसाठी चौकार” तालुक्यातील हे महत्त्वाचे ‘चार’ प्रश्न लागणार मार्गी…”
VKISCHpY