पुणेरी टाइम्स टीम…
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी दौंड तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे .
यावेळी माहिती देताना तालुकाध्यक्ष ठोंबरे म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या दि.25 रोजी दुपारी तीन वाजता चौफुला (ता.दौंड) येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे .या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार , दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी आमदार कुल यांनी आपली चाणक्य नीति वापरत बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते जुळवत विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राजकीय बेरजेचे गणित जुळवले आहे. दौंड तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्यासाठी राजकीय प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे बोलले जात आहे…
भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हानही भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुकाध्यक्ष ठोंबरे यांनी केले आहे.
1 thought on “आमदार ‘राहुल कुल’ यांच्या चाणक्य नीतिचा सुनेत्रा पवार यांना फायदा होणार, दौंड मध्ये भाजपा कडून मेळावा…”
fFHCINBXJgvqYnh