पुणेरी टाइम्स टीम – पुणे
इंदापूरचे पालकत्व म्हणजे आमदारकी असते का? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ऐन हंगामात महायुतीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपण हर्षवर्धन पाटील यांच्यासह संपूर्ण इंदापूर तालुक्याचे पालकत्व घेण्याची जबाबदारी घेत असल्याचे विधान करून हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर थेट बोलण्याचे मात्र टाळले आहे.
शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर मध्ये भाजप मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावरील टीका देखील टाळली असल्याचे दिसून आले तसेच हा मेळावा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेचा शब्द देणारा मेळावा होऊ शकतो का! अशी भीती विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांना होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांची फिरवा फिरव करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप संघटना मजबूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे.
असे असले तरी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेचा थेट शब्द फडणवीस यांनी ‘दिला नाहीच’ या मेळाव्यादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका करत तालुक्यातील पोलीस स्टेशनचा होणारा गैरवापर आणि रस्त्यांच्या कामाच्या ठेकेदारीतील कमिशन यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले.
एकंदरीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा उलटसुलट अर्थ काढत बसणार हे आगामी काळात समजेल…
1 thought on “इंदापूरचे ‘पालकत्व’ म्हणजे “आमदार की” असते का? भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला प्रश्न…”
mTeaNRVwBgqnJjEY