ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

मराठा आंदोलनातील प्रमुख चेहरा ‘योगेश केदार’ यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा, मनोज जरांगे आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधणार? सगेसोयरे बाबत लवकरच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती..‌

पुणेरी टाइम्स टीम…मराठा आंदोलन अभ्यासक, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण कसे शक्य हे ठणकावून सांगणारे तसेच मराठा वनवास यात्रेचे प्रमुख धाराशिव चे सुपुत्र योगेश केदार यांनी मुख्यमंत्री शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून आपला राजकीय प्रवेशाचा श्री गणेशा केला आहे. केदार यांना शिवसेनेच्या धाराशिव प्रवक्ते पदी नियुक्ती पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे बाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असे वक्तव्य केले आहे. आलेले तक्रारींची शहानिशा करून सरकार लवकरच निर्णय घेईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर योगेश केदार यांचा प्रवेश लक्ष वेधून घेणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा लढण्याची इच्छा समाज माध्यमातून व्यक्त केली होती. जिल्ह्यात सध्या शिवसेनेकडून संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सध्या राज्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी चळवळ उभी आहे. त्यात एका सामान्य मराठा कार्यकर्त्याला संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योगेश केदार यांनी यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचे सचिव असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी देखील बरीच कामे केली आहेत. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइन ची योजना आणली आहे. काही दिवसांपूर्वी तेर येथील गोरोबा काका मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळवून दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवास स्थानी मराठा आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असणार्या योगेश केदार यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. मराठा चळवळी बाबत मुद्देसूद भूमिका मांडणारे योगेश केदार हे चळवळ उभी करणाऱ्यां पैकी ते एक आहेत. यांनी मनोज जरांगे यांच्या बाजूने देखील माध्यमांमधून त्यांनी सकारात्मक बाजू लावून धरली होती. आता यापुढे ते मनोज जरांगे आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]