ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

संपुर्ण जिल्ह्याला ‘हादरवणाऱ्या’ वसुली अधिकाऱ्याला “भोसकून खुन” केल्याच्या घटनेतील मुख्य आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या, “दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची” मोठी कारवाई…

पुणेरी टाइम्स टीम…. धारदार सुरा पोटात खुपसून खून केल्याच्या घटनेने दौंड तालुका व संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर दौंड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करीत पोलीसांनी काही तासांच्या आत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की ‘रस्त्याने जाणाऱ्या वाहणांमुळे मला त्रास होतो. जाणून-बुजून लोकं माझ्या अंगावर वाहने घालतात…असे केल्याने मला त्रास होतो या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घालून दि. १ रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचे वसुली अधिकारी प्रवीण मळेकर यांना हातातील धारदार सुरा मारला असल्याची माहिती आरोपीने दिली आहे. या घटनेत मळेकर याचा  नाहक जीव गेला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील वासुंदे येथील पालखी महामार्गावर घडली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित घटनेचा शोध लावत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळत दौंड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.

याबाबत माहिती अशी,’मयत प्रवीण मळेकर (वय-५८) हे बँकेत रिकव्हरीचे काम करत होते.ते दि.१ रोजी रात्री आपल्या मोटारसायकल वरून बारामतीहुन पाटस येथे जात असताना वासुंदे ता.दौंडच्या हद्दीत एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिसात दिली होती. फोनवरून माहिती मिळताच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या व तपासाची सूत्रे वेगाने फिरवत घटनेचा सखोल तपास करताना पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणीही केली, अनेकांशी विचारपूस केली, सीसीटीव्ही फुटेज तपासले, यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. संबंधित खुनाच्या घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून आरोपीचा माग काढला. याअगोदरही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सदरील गुन्हातील मुख्य आरोपी दिपक रामदास लोंढे वय-३७ वर्षे (रा.वासुंदे ता. दौंड) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी केली आहे.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]