धक्कादायक, दौंड तालुक्यातील वासुंदे येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांची भोकसुन हत्या…

 पुणेरी टाइम्स टीम…

   याबाबत सविस्तर वृत्त असे की, बँक ऑफ महाराष्ट्रचे वसुली अधिकारी प्रवीण मळेकर हे त्यांचे दिवसभराचे कामकाज अटपून बारामतीकडून पुण्याच्या दिशेने जात असताना वासुंदे गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर सदरची घटना घडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. सदरचे मृत व्यक्तीचा मुलगा फिर्यादी ऋषिकेश प्रविण मळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यांचे वडील प्रविण मळेकर हे दिनांक 01/03/2024 रोजी सकाळी 09/15 वा.चे सुमारास हिरो होन्डा पँशन मोटारसायकल नंबर MH 12 EP 9336 हीवरुन बँक आँफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहते घरातुन बारामती परिसरात गेले होते. फिर्यादी यांना स्थानिकांनी फोन करुन कळिवले की, मळेकर तुमचे कोण आहेत त्यांना कोणीतरी चाकु मारला आहे व ते जखमी अवस्थेत रोडवर पडलेले आहेत. त्यांना विश्वराज हाँस्पीटल लोणी काळभोर या दवाखान्यात अँम्बुल्नसमधुन पाठवुन देत आहे. तुम्ही तेथे जावुन थांबा असे सांगितले. त्यांनतर फिर्यादी यांनी फोनवर फोन करुन सदरचा प्रकार हा कोठे झाला याबाबत विचारले असता, त्यांनी सदरचा प्रकार वासुंदे गावचे हद्दीत इंडीयन आँईल पेट्रोलपंपाचे समोर पाटस बारामती पालखी महामार्ग वर झाला असल्याचे सांगितले. रात्री 09/15 वा.चे सुमारास फिर्यादी यांचे वडील प्रविण मळेकर यांना अँम्बुलन्समधुन लोणी काळभोर येथे हाँस्पीटल मध्ये दाखल केले. प्रविण मळेकर यांच्या पोटात कोणीतरी हत्याराने भोकसल्याने त्यांचे पोटातील आतड्या बाहेर आलेल्या दिसल्या व पाठीवर कमरेवजवळ वार झालेले दिसले. त्यानंतर फिर्यादिने वडीलांना हाका मारल्या असता त्यांचे कोणत्याही प्रकारे हालचाल झाली नाही, त्यानंतर डाँक्टरांनी त्यांना तपासुन ते उपचारापुर्वीचे मयत आहेत असे घोषीत केले असे फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन धारदार हत्याराने भोकसुन त्यांना जिवे ठार मारुन त्यांचा खुन केले आहे. म्हणुन अज्ञात इसमाविरुद्द फिर्याद आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादी जबाब इकडेल प्राप्त झाल्याने दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं 164/2024 भा.द. वि कलम 302 असा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ यांनी दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड सो करीत आहेत. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून या तपासासाठी एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस सब इन्स्पेक्टर आणि 15 कर्मचारी अशी टीम त्यावर काम करत आहे, याबाबत सखोल चांगली माहिती मिळालेली आहे..

Leave a Comment

[adsforwp id="47"]