ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

आमदार ‘राहुल कुल’ यांची दौंडकरांच्या हिताची “ही मागणी” उपमुख्यमंत्री “अजित पवारांकडून” मान्य. तालुक्यातील शेतीला मिळणार…… वाचा सविस्तर बातमी

पुणेरी टाइम्स टीम…राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक शासकीय विश्रामगृह पुणे येथे आज पार पडली.या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तसेच जलसंपदा व इतर संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळवीत अशी मागणी केली तसेच जुना मुठा उजवा कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी निधी मंजुर करण्यात आला असून त्याचे काम तातडीने सुरु करावे, खडकवासला ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी भूमिगत बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने विविध मागण्या केल्या तसेच शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी केली.यावेळी सध्या खडकवासला १६ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्याचे योग्य नियोजन करीत शहर व ग्रामीण भागाचा समन्वय साधत, कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन दि. ४ मार्च २०२४ पासून व दुसरे आवर्तन ५ मे २०२४ पासून अशा प्रकारे दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय पालकमंत्री मा. ना. श्री. अजित दादा पवार यांनी जाहीर केला आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]