पुणेरी टाइम्स टीम…दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. तर अनेक मंजूर कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्या अनुषंगाने आमदार कुल यांच्याकडून मंजूर कामांची भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पणाचा सपाटा सुरू आहे…
मागील काही दिवसापासून आमदार कुल यांच्याकडून दौंड तालुक्यातील विविध गावात मोठ्या प्रमाणात विकास कामांची उद्घाटन केली आहेत त्यामुळे आमदार कुल यांच्या विकासासाच्या ध्येयाने दौंड स्वाभिमानाने झेपावतेय आणि दौंड बदलतेय असे चित्र दौंडच्या ग्रामीण भागात पहायला मिळायला लागले आहे.
आज आमदार राहुल कुल यांच्या हस्ते तालुक्यातील नाथाचीवाडी, एकेरीवाडी, देलवडी गावात अनेक विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे…