- पुणेरी टाइम्स टीम…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रदूषणामुळे दूषित झालेल्या मुळा मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या तसेच पुणे महानगरपालिकेद्वारे केला जाणारा अतिरिक्त पाणी वापर याबाबत *आमदार राहुल दादा कुल* यांनी पावसाळी आधिवेशनामध्ये कार्यवाहीची मागणी केली होती त्यानुसार नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव मा. डॉ. के. एच. गोविंदराज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली…
बैठकीमध्ये खाली प्रमुख मुद्दे आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केले –
१. मुळा मुठा व भीमा नदीच्या दूषित पाण्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीकाठचे नागरिक त्रस्त आहेत,जल प्रदूषणामुळे त्यांना विविध आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागते.
२. विशेषतः उन्हाळ्यात जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो, नदीतील जलजीवांवर विपरित परिणाम होतो तसेच डासांची प्रचंड पैदास होऊन नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
३. जलपर्णीला आळा घालण्यासाठीपुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, आधुनिक तंत्रज्ञान वापरून याबाबत कायस्वरूपी ऊपाययोजना करण्यात याव्यात.
४, खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे याबाबत अतिरिक्त वापर झालेले पाणी पुनर्प्रक्रिया करून सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे.
आमदार राहुल दादा कुल यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही आश्वासन मा. डॉ. के. एच. गोविंदराज साहेब यांनी दिले या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमार साहेब, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी होते.