पुणेरी टाइम्स टीम…
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्याच्या कुरकुंभ गावाच्या हद्दीत सोलापूर बाजूने पुणे कडील बाजूला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने एका कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सदर ट्रॅव्हल्स बसमधील 18 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये बस क्रमांक एम एच २३ डब्ल्यू ३४५७ सदरच्या ट्रॅव्हल्स बस चालक आपल्या ताब्यातील बस ही उमरगा सोलापूर या मार्गावरून पुणे बाजूला जात असताना कुरकुंभ गावच्या हद्दीत गिरमे वस्ती नजिक अचानक कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याने या अपघातामध्ये अकरा पुरुष सात महिला असे अठरा प्रवासी जखमी झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स बस चालक खंडू साधू माने ( वय ३३ वर्ष) रा. राणा गुंजवडी, ता. उमरगा जि. सोलापूर. या चालकावर कुरकुंभ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रींरंग शिंदे करत आहे.