ठळक बातम्या

जुन्या काळातील यशस्वी बांधकाम व्यावसायिक, हिगणीगाडा गावचे माजी सरपंच ‘बोबडे नाना’ यांचे अपघाती निधन…भक्तीमार्गावर वासुंदे येथे भीषण अपघात, पाटस येथील महिला तर चिंचणी येथील युवकाचा मृत्यू…कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?

रुग्णांना मिळणार पाच लाखापर्यंत मोफत उपचार, १२०९ शस्त्रक्रिया व चिकित्सांचा आहे समावेश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे हे आहे जनतेला आवाहन,


पुणेरी टाइम्स टीम…

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आपल्या सर्वांना एका अतिशय महत्त्वाचे विषयावरती संवाद साधत आयुष्यमान भारत ही राज्य शासन व केंद्र शासनाची अतिशय महत्त्वकांक्षा अशी आरोग्य विमा योजना आहे. याबाबत संवाद साधला आहे.

या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या अंगीकृत रुग्णालयांच्यामार्फत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रतिवर्षी साधारणता पाच लाखापर्यंत आरोग्य सुविधा देतो. आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा याचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये एकूण 1209 शस्त्रक्रिया आणि चिकित्सा आणि उपचार समावेश करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील एकुण ५७ खाजगी हे १२ शासकीय असे एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 16 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ४ लाख २६ हजार लाभार्थ्यांनी हे गोल्डन कार्ड काढलेला आहे. त्यामुळेच आपण राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक मोहीम स्वरूपामध्ये हे गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम जिल्ह्यामध्ये राबवत आहे.

प्रत्येक गावामध्ये नगर परिषदेच्या प्रत्येक वार्डमध्ये आशा वर्कर च्या माध्यमातून आपल्याला हे गोल्डन कार्ड काढता येणार आहे. या विषेश मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून घेतलेल्या या मोहिमेचा फायदा घ्यावा. आणि आयुष्यमान गोल्डन कार्ड काढून घ्यावे. केंद्र शासनाने यासाठी एक पोर्टल बनवलेलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याला स्वतःचे कार्ड काढता येणार आहे. माझी विनंती आहे या योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यामधले जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]