ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

स्मशानभूमीतील ‘आमरण उपोषणाची’ जिल्ह्यात चर्चा, मुंढेकरवाडीच्या ‘त्या युवकांनी या’ मागणीसाठी केलं होतं उपोषण, एका दिवसात विषय लागला मार्गी – वाचा सविस्तर…


पुणेरी टाइम्स टीम… (श्रीगोंदा)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव अंतर्गत असणारं मुंढेकरवाडी हे छोटेसे गाव आहे. मात्र येथील युवकांनी असं कामं केलय की त्याची चर्चा संपुर्ण जिल्हात होत आहे. गावांमधील विविध कामांंबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेमध्ये विकास कामं होण्यासाठीचे ठराव केले आहेत. तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने बेदखल वागत असून कोणतीही कामं होत नसल्याकारणाने मुंढेकर वाडीचे युवक कार्यकर्ते योगेश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते किरण कुरुमकर यांनी शुक्रवारी ६ ऑक्टोबर पासून मुंढेकरवाडीच्या स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा पहिलाच दिवस असल्याने लिंपणगाव व मुंढेकरवाडी येथील अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी या उपोषणाला प्रामुख्याने बीआर एस पक्षाचे टिळक भोस, मेजर प्रकाश चव्हाण, निलेश कुरुमकर, माजी सरपंच अरविंद कुरुमकर, विजय कुरुमकर, कमलेश गुंजाळ, हनुमंत कुरुमकर, अजित चव्हाण, संतोष जाधव, तात्या कणसे, आबा लोखंडे, बबन कुरुमकर, सतीश भगत आदींनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे या आंदोलनाची चांगलीच चर्चा होत होती.

  •   दरम्यान उपोषणकर्ते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात जवळपास आठ प्रमुख विकास कामांच्या मागण्यांची ग्रामपंचायत प्रशासनाने विना विलंब कार्यवाही करावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उपोषण दरम्यान पंचायत समितीचे कक्षा अधिकारी डी. डी. समुद्र, ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या पंधरा दिवसात मार्गी लावण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

लेखी आश्वासनामध्ये मुंढेकरवाडी येथील स्मशानभूमी येथे पंधरावा वित्त आयोग सन २०२३- २३ मुंढेकरवाडी, खोडवेवस्ती, कासारपत्रावस्ती, जाधव वस्ती, समशानभूमी हातपंप घेणे, या कामासाठी दोन लाख ४० हजार तरतूद करण्यात आलेली आहे. २०२३-२४ मध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये गटार लाईन करणे, हे काम प्रास्तावित आहे. त्यासाठी चार लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे उपोषणकर्त्यांनी सुचविलेनुसार जन सुविधा योजनेअंतर्गत नवीन आरसीसी स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात येईल. तसेच समशानभूमीमध्ये लाईट बल्बची सुविधा करण्यात येईल. पंचक्रोशीमध्ये सर्व ठिकाणी विविध योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांचा बोर्ड लावण्याचे सुचविले होते, त्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. स्ट्रीट लाईट बसविणे वार्ड क्रमांक सहा सात वार्ड नंबर सहा मधील बंद बल्ब नवीन बसविण्यात येतील. यादी लेखी स्वरुपात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना कळविले असल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे उपोषण करते योगेश चव्हाण व किरण कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment

[adsforwp id="47"]