ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ “या मागणीसाठी” जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक…

पुणेरी टाइम्स टीम (पुणे)…

शाळाबाह्य अशैक्षणिक कामे, ऑनलाईन कामे बंद करा आणि आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 2 ऑक्टोबर रोजी महा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये राज्यभरातील शिक्षक लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. या महामोर्चाच्या प्रचार प्रसाराची प्रातिनिधिक सुरुवात दौंड तालुक्यात शिक्षक नेते शांताराम जगताप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी बोलताना शांताराम जगताप यांनी सांगितले की अशैक्षणिक कामे ,ऑनलाईन कामे, अवाजवी माहित्या यामुळे शिक्षक बेजार झाले असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवर होत आहे. त्यातच शासनाने शाळांचे खाजगीकरण आणि कंत्राटी भरतीचे धोरण आणल्याने शाळा समूह योजना आणल्याने राज्यभरातील जवळपास 15000 शाळा बंद होणार असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुळात शासकीय शाळेत शिकणारी मुलेही गोरगरीब, कष्टकरी ,शेतकरी ,कामगार जनतेची मुले आहेत त्यांचा शिक्षणाचा हक्क आबाथित ठेवायचा असेल शासकीय शाळा टिकवायच्या असतील तर शिक्षकांसह ,पालक ,ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे .या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून या सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न शिक्षक संघाच्या वतीने केला जाणार आहे. याप्रसंगी विकास शेलार, रामभाऊ दोरगे, संदीप होले ,किरण कोल्हे ,सुरेश वाळके आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते._

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]