पुणेरी टाइम्स टीम…
दौंड शहरातील गोपाळवाडी रोड परिसरातील अमर सोसायटी येथे प्रताप खानविलकर व मनीषा खानविलकर या दांपत्याने मुलगी स्वामिनी खानविलकर यांच्यासह गौरी गणपतीच्या पुढे घरगुती सजावटीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बारशाचा (नामकरण सोहळा)देखावा सादर केला आहे.
प्रताप खानविलकर हे गेली अनेक वर्ष गौरी गणपती मध्ये पारंपारिक व वैविध्यपूर्ण देखावे सादर करतात एखाद्या मंडळाच्या प्रमाणे ही सजावट परिश्रमपूर्वक व आकर्षक पद्धतीने सादर केलेली असते. आपल्या परंपरेची व्ही संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने ते दर वर्षी घरघुती देखाव्यासाठी मेहनत घेतात व आपला वेळ देतात.
खानविलकर हे बँकेमध्ये नोकरीला असून गौरी गणपती सणाच्या आधी तीन महिने ते या सजावटीवर मेहनत घेतात. बँकेतून आल्यानंतर वेळात वेळ काढून रोज एक तास याप्रमाणे त्यांनी सजावटीची उभारणी केली आहे. त्यांचा देखावा पाहण्यासाठी गोपाळवाडी रोड परिसर व दौंड शहरातील अनेक जण आवर्जून भेट देत असतात व त्यांच्या घरगुती व पारंपारिक देखाव्याचे नेहमीच कौतुक होत असते.
1 thought on “प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे असा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बारशाचा किल्ले पुरंदर वरचा हलता देखावा पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…”
श्री इनामदार आनंद नरहरी यांच्या घरी गौरी गणपतीच्या सणानिमित्त संतांचा महिमा हा हलता देखावा सादर केला होता दरवर्षीप्रमाणे हलत्या देखण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे आजपर्यंत त्यांनी कृष्णाची लीला दौंड ची काळभैरवनाथ यात्रा पूर्ण चला खेडे गावाकडे जाऊया सामाजिक व वैज्ञानिक व धार्मिक अशा देखाव्याची परंपरा ते सतत गौरी गणपतीच्या सणानिमित्त आपल्या घरामध्ये सादर करत असतात या वर्षी त्यांनी संतांचा महिमा या हलत्या देखाव्यातून संतांचे महत्त्व व त्यांचे कार्य व भक्तिमय अशा वातावरणामध्ये त्यांनी हा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करण्यामागे पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे मी आनंद नरहरी इनामदार व माझ्या पत्नी अनघा आनंदी नामदार व माझ्या दोन मुली आणि माझी आई सगळे मिळून आम्ही रोज पंधरा दिवस दोन तास संध्याकाळी वेळ काढत असतो मी दौंड येथील कुरकुम एमआयडीसीमध्ये एम क्युअर फर्मासिटिकल कंपनीमध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून कामावर आहे रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर पंधरा दिवस पूर्ण नियोजन करून वेळात वेळ काढून दोन तास आम्ही या देखावाची संकल्पना सादर करत असतो देखावा सादर करण्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसा हा देखावा सादर केला जाईल हा विचारा मी सतत केला जातो हा देखावा सादर करण्यामागे एकच उद्देश असतो की नवीन पिढीला सर्व काही गोष्टी माहित व्हाव्यात हा आमचा उद्देश महत्त्वाचा असतो हा हालता देखावा दौंड येथे जनता कॉलनी शिवालय अपार्टमेंट फ्लॅट नंबर सहा फादर स्कूलच्या बॅक साइड या ठिकाणी सादर केला होता धन्यवाद