ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

इंदापूरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याचे नित्कृष्ट काम, प्रशासन मुक गिळून गप्प?

पुणेरी टाइम्स टीम…

इंदापूर शहरा नजिक होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे…याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की,इंदापूर शहरा नजीक देशपांडे व्हेज हाॅटेलच्या पाठीमागे नव्याने होत असलेल्या पुणे- सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रोडचे काम एन. पी. इन्फ्रा या कंपनीकडून केले जात असल्याचे बोलले जात आहे. या कामाला कोट्यावधी रुपये खर्च होणार असून नॅशनल हायवे कडील हे काम असल्यामुळे ते अत्यंत दर्जेदार होण्यासाठी करोडो रुपये सरकारचे खर्चले जाणार आहेत, असे असताना मात्र या कामात मुरूम ऐवजी चक्क चिखल, माती वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. आज दि.६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास या नॅशनल हायवेच्या कामासाठी हायवा डंपरने चक्क मीती व चिखल टाकण्यात येत असल्याचे पोपट शिंदे व शेतकरी यांच्या निदर्शनास आले. या कामासाठी मुरूम टाकण्याचे ऐवजी चिखल युक्त गाळ माती वापरली जात आहे. याचे प्रत्यक्षिकच पोपट शिंदे यांनी कंपनीचे सुपरवायझर व उपस्थित पत्रकारांसमोर करून दाखवले. यानंतर संबंधित कंपनी प्रशासनाला आपली चुक लक्षात आली आहे. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पोपट शिंदे यांनी उदाहरणासह दाखवून दिले.

त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच महामार्ग प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या रोडवर होत असलेल्या निकृष्ट कामाची भ्रमणध्वनी द्वारे माहिती देत त्यांना त्या चिखलाचे व्हिडिओ ही पाठवून दिले. त्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले असून येत्या दोन दिवसात या निकृष्ट कामाच्या विरोधात नॅशनल हायवे प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन संबंधित अधिकारी यांना निवेदन देणार असून याच रस्त्यालगत उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment

[adsforwp id="47"]