पुणेरी टाइम्स – बारामती
बारामती तालुक्यातील कारखेल गावचे सुपुत्र मोहन फक्कडराव भापकर यांनी भारतीय वायुदलात वीस वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झाले आहेत, भापकर यांचे शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअर, ग्रॅज्युएशन (इंग्लिश) एमबीए (एच.आर) झाले असून, त्यांनी आपल्या सेवा कार्यकाळात मिग-23, मिग-27, सुखोई या विमानांचे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कामकाज पाहिले आहे.भापकर यांनी आपली सेवा पंजाब, आसाम, मद्रास, कानपूर या ठिकाणी बजावली आहे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेत भापकर यांनी आपला अर्ज केला होता. त्यानंतर कोरोना मुळे सदर परीक्षेचा निकाल 2022 साली लागला व भापकर यांना असिस्टंट मोटर व्हेईकल्स इन्स्पेक्टर (RTO) पदी वर्णी लागली. आणि अनेक तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करत वयाच्या 45 व्या वर्षी आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून नेत्रदीपक यश मिळवले.
भापकर यांना नुकत्याच बारामती उपप्रादेशिक परिवर्तन कार्यालय येथे नियुक्तीची सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मिग -23, मिग – 27, सुखोई सारख्या विमानांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला बारामतीतील वाहनांची तपासणी करण्याची संधी मिळणार आहे,…
वीस वर्ष भारतीय वायुसेनेत मिग-23, मिग-27, सुखोई यासारख्या अत्याधुनिक विमानांचा देखभाल करणारा वायु सैनिक निवृत्तीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सज्ज झाला आहे…
मोहन भापकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आता बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इन्स्पेक्टर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे बेशिस्तपणे वाहतुकीचे नियमन करणारे अनेक वाहन धारकांना वाहतुकीचे नियम लावण्याचं करण्याचे काम आता भापकर करणार आहेत….
–
वडील शेती करत असून त्यांनी आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट केले आहे मात्र आम्ही शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजामध्ये उत्कृष्ट काम करून त्यांच्या कष्टाचे चीज करून दाखवले…
-मोहन भापकर
-असिस्टंट मोटर व्हेईकल्स इन्स्पेक्टर (RTO)