पुणेरी टाइम्स टीम -दौंड
कोईमतूर येथील १९व्या राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस स्पर्धेत दौंड च्या शंभूराजे लोंढे याने उज्ज्वल यश मिळविले आहे. या स्पर्धेत शंभूराजे याने तृतीय पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धसाठी विविध राज्यांतील जवळपास ८ हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या यशा मागे त्याचे पालकांचे पाठबळ व गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले आहे. शंभूराजेच्या या यशाबद्दल दौंड तालुक्यातून सर्व स्तरातून तसेच लिगांळी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.