पुणेरी टाइम्स टीम
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना आयोजित शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सन २०२३-२४ जनहित प्रतिष्ठान बारामती येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांसाठी मुलींच्या गटामध्ये एकूण ३० संघ बारामती तालुक्यामधून आले होते. या आंतरशालेय शासकीय कबड्डी स्पर्धांमध्ये १४ वर्ष वयोगटामध्ये *संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी या विद्यालयाच्या मुलींच्या संघाने जनहित प्रतिष्ठान बारामती विरुद्धचा अंतिम सामना एकतर्फी जिंकून प्रथम क्रमांक मिळवला. पुढील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये बारामतीचा संघ म्हणून संत तुकाराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर बारामती तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. सर्व विजयी खेळाडू विद्यार्थीनींचे त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे संस्थापक / अध्यक्ष मा.श्री महादेव काळे, मुख्याध्यापिका मा.सौ. सुषमा काळे, क्रीडा शिक्षक मा.विजय काळकुटे तसेच मा.शुभम इंगवले, शिक्षक वर्ग, पालक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.